Abhang 745
मन गुंतलें लुलयां । जाय धांवोनि त्या ठाया ॥१॥ ॥ ध्रु. ॥ मागें परतावी तो बळी । शूर एक भूमंडळीं ॥२॥ येऊनियां घाळी घाला । नेणों काय होई तुळा ॥३॥ तुका ह्मणे येणें । बहु नाडिले शाहाणे ॥४॥
मन एखाद्या आकर्षणात (मोहात) गुंतून जातं आणि त्या दिशेने धावत सुटतं. त्याला मागे ओढून आणणारा खरा शूर, खरा वीर या पृथ्वीतलावर विरळाच. तिथे कुणीतरी येऊन हल्ला करतं, आणि मग काय होतं हे कळतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या मोहापायी अनेक शहाणी माणसंही फसली, नाडली गेली आहेत.
pocketpage.in