Abhang 765
डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥१॥ ॥ध्रु.॥ तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥२॥ मेळवूनि नरनारी । शकुन सांगती नानापरी ॥३॥ तुका ह्मणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥४॥
डोक्यावर केस वाढवून हे लोक अंगात भूतं आणल्याचं सोंग करतात. ॥१॥ ध्रु.॥ पण असे लोक खरे संत नसतात, त्यांच्यात आत्मज्ञानाची खूणही नसते. ॥२॥ स्त्री-पुरुषांना एकत्र जमवून वेगवेगळ्या प्रकारे शकुन-भविष्य सांगतात. ॥३॥ तुकाराम म्हणतात, हे सगळे भोंदू आहेत, त्यांच्याजवळ देव मुळीच नाही. ॥४॥
pocketpage.in