Abhang 773
पाववील ठाया । पांडुरंग चितिलिया ॥१॥ ॥ध्रु.॥ त्यासी चितिलिया मनीं । चित्ता करी गंवसणी ॥२॥ पावावया फळ । अंगीं असावें हें बळ ॥३॥ तुका ह्मणे तई । सिद्धि वोळगती पायीं ॥४॥
पांडुरंगाचं मनापासून चिंतन केलं, की तो आपल्याला इच्छित ठिकाणी पोचवतो. ॥१॥ ध्रु.॥ मनात त्याचं चिंतन केलं की तो मनाला पूर्णपणे व्यापून टाकतो. ॥२॥ हे फळ मिळवण्यासाठी मनात तेवढी दृढता, ताकद हवी. ॥३॥ तुकाराम म्हणतात, मग सगळ्या सिद्धी येऊन पायाशी लोळण घेतात. ॥४॥
pocketpage.in