Abhang 783
अवघ्या पापें घडला एक । उपासक शक्तीचा ॥१॥ ॥ध्रु.॥ त्याचा विटाळ नको अंगा । पांडुरंगा माझिया ॥२॥ काम क्रोध मद्य अंगीं । रंगला रंगीं अवगुणी ॥३॥ करितां पाप न धरी शंका । ह्मणे तुका कोणी ही ॥४॥
शक्तीचा उपासक हा माणूस संपूर्णपणे पापांनीच बनलेला असतो. ॥१॥ ध्रु.॥ हे पांडुरंगा, त्याचा विटाळ माझ्या अंगाला नको. ॥२॥ त्याच्या अंगात काम, क्रोध, दारू भरलेली असते, तो सगळ्या दुर्गुणांनी रंगलेला असतो. ॥३॥ पाप करताना त्याला कसलीच भीती किंवा शंका वाटत नाही, तुकाराम म्हणतात असा हा कोणीही असो. ॥४॥
pocketpage.in