Abhang 788
सांडुनियां पंढरीराव । कवणातें ह्मणो देव ॥१॥ ॥ध्रु.॥ बहु लाज वाटे चित्ता । आणिकांतें देव ह्मणतां ॥२॥ सांडुनियां हिरा । कोणें वेचाव्या त्या गारा ॥३॥ तुका ह्मणे हरिहर । ऐसी सांडुनियां धुर ॥४॥
पंढरीरायाला सोडून दुसऱ्या कोणाला देव म्हणू? ॥१॥ ध्रु.॥ दुसऱ्या कोणाला देव म्हणताना मनाला खूप लाज वाटते. ॥२॥ हिरा सोडून खडे कोण वेचत बसेल? ॥३॥ तुकाराम म्हणतात, असा थोर हरिहर सोडून दुसऱ्या क्षुल्लक देवतांच्या नादी कोण लागेल? ॥४॥
pocketpage.in