Abhang 796
वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाउलें कै वो डोळां ॥१॥ ॥ध्रु.॥ तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वास तुझी ॥२॥ तुका ह्मणे माझ्या आसावल्या बाह्या । तुज क्षेम द्याया पांडुरंगा ॥३॥
वाट बघून बघून माझे डोळे शिणले, हे विठ्ठला, तुझी पावलं मला डोळ्यांना कधी दाखवशील? ॥१॥ ध्रु.॥ तू माझी माय-माऊली आहेस, कृपेची सावली आहेस, विठ्ठला, मी तुझी वाट बघत आहे. ॥२॥ तुकाराम म्हणतात, हे पांडुरंगा, तुला प्रेमाने मिठी मारायला माझे बाहू आतुरले आहेत. ॥३॥
pocketpage.in