Abhang 802
दुःख वाटे ऐसी ऐकों नये गोष्टी । जेणें घडे तुटी तुझ्या पायीं ॥१॥ ॥ ध्रु. ॥ येतो कळवळा देखोनियां घात । करितों फजित नाइकती ॥२॥ काय करूं देवा ऐसी नाहीं शक्ति । दंडुनि पुढती वाटे लावूं ॥३॥ तुका ह्मणे मज दावूं नको ऐसें । दृष्टीपुढें पिसें पांडुरंगा ॥४॥
जी गोष्ट ऐकली की दुःख होतं, जिच्यामुळे तुझ्या चरणांपासून तुटी येते, अशी गोष्ट ऐकूच नये. कुणाचं वाईट होताना बघून माझ्या मनात कळवळा येतो, मी त्यांना समजावतो, रागावतो, पण ते ऐकत नाहीत. देवा, मी काय करू, मला तेवढी ताकद नाही की त्यांना शिक्षा करून पुन्हा योग्य मार्गावर आणावं. तुका म्हणतो, पांडुरंगा, अशी वेडीवाकडी माणसं माझ्या डोळ्यांसमोर दाखवू नकोस.
pocketpage.in