Abhang 806
आतां असों मना अभक्तांची कथा । न होईं दुश्चिता हरिनामीं ॥१॥ ॥ ध्रु. ॥ नये त्याची कदा गोष्टी करूं मात । जिव्हे प्रायश्चित्त त्याच्या नांवें ॥२॥ प्रभातें न घ्यावें नांव माकडाचें । तैसें अभक्ताचें सर्वकाळ ॥३॥ तुका ह्मणे आतां आठवूं मंगळ । जेणें सर्व काळ सुखरूप ॥४॥
आता मना, अभक्तांची गोष्ट सोडून दे, हरिनामापासून मन विचलित होऊ देऊ नकोस. त्याची कधीही चर्चासुद्धा करू नये, त्याचं नाव घेणं म्हणजे जिभेला प्रायश्चित्तच होय. जशी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये, तसंच अभक्ताचं नाव कधीही घेऊ नये. तुका म्हणतो, आता आपण मंगल गोष्टींचं स्मरण करू, ज्यामुळे सदासर्वकाळ सुख लाभेल.
pocketpage.in