Abhang 837
धांव घालीं आई । आतां पाहातेसी काई ॥१॥ ॥ ध्रु. ॥ धीर नाहीं माझे पोटीं । जालें वियोगें हिंपुटी ॥२॥ करावें सीतळ । बहु जाली हळहळ ॥३॥ तुका ह्मणे डोई । कधीं ठेवीन हे पायीं ॥४॥
आई, धावत ये, आता कशाची वाट पाहतेस? माझ्या पोटात धीर उरलेला नाही, वियोगाने मी अगदी व्याकुळ झालो आहे. माझं मन शांत, शीतल कर, माझी फार तगमग होते आहे. तुका म्हणतो, हे माझं मस्तक तुझ्या पायी कधी ठेवीन असं झालं आहे.
pocketpage.in