Abhang 839
देऊं ते उपमा । आवडीनें पुरुषोत्तमा ॥१॥ ॥ ध्रु. ॥ पाहातां कासया तूं सारिखा । तिहीं लोकांच्या जनका ॥२॥ आरुष हे वाणी । गोड करूनि घेतां कानीं ॥३॥ आवडीनें खेळे । तुका पुरवावे सोहाळे ॥४॥
पुरुषोत्तमा, तुला आवडीने कोणती उपमा देऊ? पाहू गेलं तर, हे तिन्ही लोकांच्या जनका, तुझ्यासारखं दुसरं कोणीच नाही. माझी ही रांगडी, साधी वाणी तू गोड मानून कानात घे. तू आवडीने खेळ खेळतोस, तुका म्हणतो, माझेही लाड-कौतुक तूच पुरव.
pocketpage.in