Abhang 899
कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥१॥ ॥ध्रु.॥ केसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥२॥ भुस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥३॥ तुका ह्मणे लागे हातां । काय मथिलें घुसळितां ॥४॥
हुशार म्हणवणारेही उगाच निषेध-वादात गुंतले; वादी लोक वादातच गढून गेले ॥१॥ हे बिचारे कसे फसले, ढोंग आणि विषयासक्तीच्या जाळ्यात कसे अडकले, बघा ॥२॥ नुसते भूस (टरफल) उपणून काय मिळवले? दोन्हीकडून हातचे गेले ॥३॥ तुकाराम म्हणतात, एवढे घुसळूनही हाती काय लागले, तेच कळत नाही ॥४॥
pocketpage.in