Abhang 921
एवढा प्रभु भावें । तेणें संपुष्टी राहावें ॥१॥ ॥ध्रु.॥ होय भक्तीं केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥२॥ एवढा जगदानी । मागे तुळसीदळ पाणी ॥३॥ आला नांवा रूपा । तुका ह्मणे जाला सोपा ॥४॥
एवढा मोठा प्रभू भक्तिभावाने एवढ्याशा (मूर्तीच्या) परिघात राहतो. भक्ताने जसा भाव ठेवला तसाच तो बनतो, आणि ती इच्छा तो पुरी करतो. एवढा मोठा जगाला दान देणारा देव फक्त तुळशीचं पान आणि पाणी मागतो. तुकाराम म्हणतात, तो नावारूपाला (मूर्तिरूपाला) आला, आणि त्यामुळे भक्ती करणं सोपं झालं.
pocketpage.in