Abhang 939
बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न धरा च ॥१॥ ॥ध्रु.॥ आतां काशासाटीं देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥२॥ तुह्या आह्यां जाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥३॥ तुका ह्मणे लाजिरवाणे । अधीर जिणें इच्छेचें ॥४॥
अनेक प्रकारे मी याचना-विनवणी करत आलो, ते मनावर घेऊ नका. देवा, आता कशासाठी उगाच खोटा हेवादावा वाढवायचा? तुझ्या-माझ्यात आता तुटी (दुरावा) झाला आहे, आता फक्त चिंतनानेच भेट होईल. तुकाराम म्हणतात, इच्छेवर जगणं हे लाजिरवाणं आणि अधीर जिणं आहे.
pocketpage.in