Abhang 940
आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥१॥ ॥ध्रु.॥ मढ्यापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥२॥ न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥३॥ तुका ह्मणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥४॥
एक आश्चर्य घडलं, ते माझ्या मनात आलं. प्रेतासमोर जशी करुणा भाकावी, तशी माझी विनवणी वाया गेली. मग खोटेपणा दिसल्यावर राग येऊ नये तरी कसा? तुकाराम म्हणतात, विठ्ठला, माझ्या बोलण्याचा आता काय उपयोग, त्यापेक्षा तूच शोध घे.
pocketpage.in