Abhang 943
अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥१॥ ॥ध्रु.॥ तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥२॥ पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥३॥ तुका ह्मणे कंठीं नाम । अंगीं भरलेंसे प्रेम ॥४॥
अभय (निर्भयता) मिळण्याचं ठिकाण एकच आहे आणि ते अढळ, कायमचं आहे. म्हणून मी विश्वास ठेवला आणि दास होऊन राहिलो. माझी आवड पुरी झाली, पायांशी गोडी लागली. तुकाराम म्हणतात, कंठात नाम आहे आणि अंगात प्रेम भरून राहिलं आहे.
pocketpage.in