Abhang 944
संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥१॥ ॥ध्रु.॥ आतां नको मज खोट्यानें फसवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥२॥ गेला तरि काय जीवाचें सांकडें । वांचउनि पुढें काय काज ॥३॥ तुका ह्मणे कसीं निवडा जी बरें । केलीं तैसीं पोरें आळीपायीं ॥४॥
संशय दूर झाला तरच गोडी वाटते, संशय असेल तर गोष्ट फिकी वाटते, त्यात काही रस उरत नाही. आता मला खोट्या आशेने फसवू नका, किती वेळा येऊ-जाऊ, हेलपाटे घालू? गेलो (मेलो) तर जिवाला कसली काळजी, आणि वाचून राहूनही पुढे काय साधणार? तुकाराम म्हणतात, आता नीट निवाडा करा, हट्टापायी लहान मुलांसारखं आम्हांला वागवू नका.
pocketpage.in