Abhang 954
जीव जायवरी सांडी करी माता । हे तों आश्चर्यता बाळकाची ॥१॥ ॥ ध्रु. ॥ दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जालें ॥२॥ क्षणक्षणा माझा न घ्यावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥३॥ तुका ह्मणे नाहीं वचनासी रुचि । फल कटवें चि तें तें होय ॥४॥
आई तर जीव जाईपर्यंतच मुलाला सोडत नाही, पण माझी अवस्था याहून विचित्र आहे (देव मला असा सोडून देतो) ॥१॥ ध्रु.॥ मी दुर्बळ आहे म्हणून माझें ऐकलें जात नाही का? देवाच्या ठिकाणी काय कमी पडलें? ॥२॥ क्षणोक्षणी माझी काळजी घेतली जात नाही, असा हा माझा दुर्दैवी काळ आलेला आहे ॥३॥ तुका म्हणतो, माझ्या शब्दांना किंमत नाही, जें काही फळ मिळतें तें कडूच असतें ॥४॥
pocketpage.in