Abhang 960
आधार तो व्हावा । ऐसी आस करीं देवा ॥१॥ ॥ ध्रु. ॥ तुह्मांपाशीं काय उणें । काय वेचे समाधानें ॥२॥ सेवेच्या अभिलाषें । मन बहु जालें पिसें ॥३॥ अरे भक्तपराधीना । तुका ह्मणे नारायणा ॥४॥
तूंच माझा आधार व्हावास, अशी आशा मी देवा तुझ्याकडे धरतो ॥१॥ ध्रु.॥ तुझ्याकडे काय कमी आहे? समाधान देण्यात काय खर्च होतो? ॥२॥ तुझी सेवा करण्याच्या ओढीनें माझें मन अगदी वेडावलें आहे ॥३॥ अरे भक्तांच्या अधीन असणाऱ्या नारायणा, तुका असें म्हणतो ॥४॥
pocketpage.in