Abhang 968
कल्पतरु रुया नव्हती बाभुळा। पुरविती फळा इच्छितिया ॥१॥ उदंड त्या गाई म्हसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेनु ॥२॥ तुका ह्मणे देव दाखवील दृष्टी । तया सवें भेटी थोर पुण्य ॥३॥
कल्पवृक्ष हा काही बाभळीच्या झाडासारखा नसतो, तो मागेल ती इच्छा पुरी करतो ॥१॥ गायी, म्हशी आणि शेळ्या खूप असतात, पण त्या कामधेनूसारख्या नसतात (कामधेनू वेगळीच असते) ॥२॥ तुका म्हणतो, देव ज्याला दर्शन देईल, त्याची भेट होणें हेंच मोठें पुण्य आहे ॥३॥
pocketpage.in