Abhang 979
धन्य ते संसारीं । दयावंत जे अंतरीं ॥१॥ ॥ ध्रु. ॥ येथें उपकारासाठीं । आले घर ज्यां वैकुंठी ॥२॥ लटिकें वचन । नाहीं देहीं उदासीन ॥३॥ मधुरा वाणी ओटीं । तुका ह्मणे वाव पोटीं ॥४॥
संसारात खरोखर धन्य तेच आहेत, ज्यांच्या मनात खरी दया आहे ॥१॥ ध्रु.॥ ज्यांचें खरें घर वैकुंठ आहे, तेच लोकांचें भलें करण्यासाठी इथें [या जगात] आले आहेत ॥२॥ त्यांचें बोलणें खोटें नसतें, ते उदासीन/निष्काळजीही नसतात ॥३॥ पण काहीजणांच्या तोंडी गोड बोलणें असतें, तुका म्हणतो, त्यांच्या पोटात मात्र पोकळपणा/खोटेपणा असतो ॥४॥
pocketpage.in