Abhang 982
शेवटीची विनवणी । संतजनीं परिसावी ॥१॥ ॥ ध्रु. ॥ विसर तो न पडावा । माझा देवा तुह्मांसी ॥२॥ पुढें फार बोलों काई । अवघें पायीं विदित ॥३॥ तुका ह्मणे पडिलों पायां । करा छाया कृपेची ॥४॥
ही माझी शेवटची विनंती, संतजनांनी ऐकावी ॥१॥ ध्रु.॥ देवा, तूं मला कधी विसरू नकोस ॥२॥ यापुढें अधिक काय बोलूं? सगळें तुझ्या पायांशी आधीच माहीत आहे ॥३॥ तुका म्हणतो, मी तुझ्या पायां पडलो आहे, मला तुझ्या कृपेची सावली दे ॥४॥
pocketpage.in