Abhang 985
देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥१॥ ॥ ध्रु. ॥ देणें न लगे देणें न लगे । साठवणीचे रुघले जागे ॥२॥ देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करूं ॥३॥ देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल कांहीं ॥४॥ दुबळा तुका भावेंविणें । उधारा देव घेतला रुणें ॥५॥
देव घ्या कोणी, देव घ्या कोणी! तयार होऊन घरोघरी विचारत आला आहे ॥१॥ ध्रु.॥ पैसे द्यायची गरज नाही, द्यायची गरज नाही; साठा तसाच पडून आहे (ही ओळ मूळ प्रतीतही थोडी अस्पष्ट आहे) ॥२॥ देवाचा भाव उतरला, भाव उतरला; श्रद्धाच बुडाली, आतां काय करूं? ॥३॥ देव फुकट घ्या, फुकट घ्या; एक दमडीसुद्धा किंमत लागत नाही ॥४॥ गरीब तुकाला खरी श्रद्धाही नाही, तरी त्यानें देव उधार, कर्जावरच घेतला ॥५॥
pocketpage.in