Abhang 987
कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ॥१॥ ॥ ध्रु. ॥ कोणी व्हा रे अधिकारी । त्यासी हरि देईल ॥२॥ वैराग्याचे बळें । साही खळ जिणावे ॥३॥ उरेलना उरी। तुका करी बोभाट ॥४॥
कीर्तनाची गोडी कोणाला मिळावी हें देवच स्वतः ठरवतो ॥१॥ ध्रु.॥ जो कोणी त्यासाठी पात्र/अधिकारी होईल, त्यालाच हरि ती देईल ॥२॥ वैराग्याच्या बळावर सहा शत्रूंवर (काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर) मात करावी ॥३॥ मग काहीच शिल्लक उरणार नाही; तुका हें मोठ्यानें जाहीर करतो ॥४॥
pocketpage.in