साहेब साहेब सब कहैं, मोहिं अंदेशा और।
साहेब से परिचय नहीं, बैठोगे केहि ठौर॥
सगळे ‘स्वामी, स्वामी’ म्हणून हाका मारतात; हा स्वामी म्हणजे देव, कबीर ज्याला ‘साहेब’ म्हणतात. पण मला काळजी वेगळ्याच गोष्टीची आहे, कबीर सांगतात. या स्वामीशी तुमची ओळखच नाही, मग तुम्हाला बसायला जागा कुठे मिळणार?
धन्याच्या नावाने हाका मारणे आणि धन्याला ओळखणे, या दोन निराळ्या गोष्टी आहेत.