संत कबीर · कर्मकांड, जात आणि पंथ यांपलीकडे
संत कबीर · कर्मकांड, जात आणि पंथ यांपलीकडे
सावन केरा सेहरा, बुन्द परा असमान। सारी दुनियाँ वैष्णव भई, गुरु नहिं लागा कान॥
श्रावणाच्या झडीत आभाळातून सगळीकडे थेंब पडतात, तसे सारे जग वैष्णव झाले. पण कोणाच्याच कानात गुरूने मंत्र सांगितला नाही. गुरू शिष्य करून घेतो, तेव्हा त्याला असा कानमंत्र देतो. धर्माचे नाव श्रावणसरींसारखे सगळ्यांवर भरभरून बरसले, पण शिकवण एकालाही मिळाली नाही.