पाहन पूजे हरि मिलै, तो मैं पूजूँ पहार।
तातैं ये चाकी भली, पीसि खाय संसार॥
दगड पुजून हरी भेटत असेल, कबीर म्हणतात, तर मी अख्खा डोंगरच पूजीन. त्यापेक्षा हे घरातले जाते बरे; त्यावर दळून सारे जग खाते.
जातेही दगडाचेच असते: दोन गोल दगड, आणि त्यांतला वरचा हाताने फिरवायचा. दगडाच्या या दोन रूपांपैकी कबीर जगाचे धान्य दळणाऱ्या दगडाला श्रेष्ठ ठरवतात.