संत कबीर · कर्मकांड, जात आणि पंथ यांपलीकडे
तीर्थात नुसते पाणी
तीरथ में तो सब पानी है होवे नहीं कछु अन्हाय देखा प्रतिमा सकल तो जड़ है भाई बोले नहीं बोलाय देखा पुराण-कुरान सबै बात है या घट का पर्दा खोल देखा अनुभव की बात कबीर कहै यह सब है झूठी पोल देखा॥
तीर्थक्षेत्री नुसते पाणीच आहे. मी तिथे स्नान करून पाहिले आहे: न्हाल्याने काहीही होत नाही. भाऊ, देवांच्या सगळ्या मूर्ती जड आहेत, निर्जीव आहेत. मी त्यांना हाका मारून पाहिल्या आहेत: कितीही बोलावले, तरी त्या बोलत नाहीत. पुराणे काय, कुराण काय, सगळे नुसते बोलणे आहे. या देहाच्या आतला पडदा मी उघडून पाहिला आहे. कबीर स्वतः अनुभवलेलेच सांगतात: मी पाहिले आहे, हे सगळे पोकळ ढोंग आहे.