संत कबीर · कर्मकांड, जात आणि पंथ यांपलीकडे
मनोऱ्यावर कशाला चढतोस?
मुला मुनारै क्या चढ़हि, अला न बहिरा होइ। जेहिं कारन तू बांग दे, सो दिल ही भीतरि जोइ॥
मुल्ला, मनोऱ्यावर कशाला चढतोस? अल्ला काही बहिरा नाही. ज्याच्यासाठी तू बांग देतोस, कबीर म्हणतात, त्याला आपल्या हृदयातच शोध. मुल्ला मशिदीच्या मनोऱ्यावरून मोठ्याने बांग देतो. देव जणू कुठे दूर बसला आहे आणि त्याला कमी ऐकू येते, अशा थाटात चाललेल्या या आरडाओरड्याची कबीर टर उडवतात. कबीरांचा देव तर बांग देणाऱ्याच्या आतच राहतो.