कबीर मरनां तहं भला, जहां आपनां न कोई।
आमिख भखै जनावरा, नाउं न लेवै कोई॥
मरावे तर तिथे, कबीर म्हणतात, जिथे आपले असे कोणी नाही. जनावरे देहाचे मांस खातील, आणि कोणी नावसुद्धा घेणार नाही.
आपल्या माणसांत मरण आले असते, तर रडणारे असते, नाव घेणारे असते. इथे कोणी नाव घेत नाही; मागे काहीच उरत नाही, नावसुद्धा.