संत कबीर · अंतरीचा देव
तिळातले तेल
ज्यों तिल माहीं तेल है, ज्यों चकमक में आग। तेरा साईं तुझ में है, तू जाग सके तो जाग॥
जसे तिळात तेल असते, जसा चकमकीत अग्नी असतो, तसा तुझा स्वामी तुझ्यातच आहे. जागा होऊ शकत असशील, तर जागा हो. तीळ घाण्यात पिळल्याशिवाय त्यांतले तेल दिसत नाही, आणि चकमकीवर घाव पडल्याशिवाय तिच्यातली आगही दिसत नाही. देवही माणसाच्या आत असाच दडलेला असतो. कबीर सांगतात ते जागे होणे म्हणजे देवाला प्रकट करणारा प्रयत्न.