संत कबीर · अंतरीचा देव
शिष्याच्या पाया पडणारे गुरू
निर्गुन आगे सरगुण नाचै बाजे सोहं तूरा चेला के पाँव गुरुजी लागे यही अचंभा पूरा॥
रूप नसलेल्या निर्गुणापुढे रूप धारण केलेला सगुण नाचतो. सोहंची तुतारी वाजते; ‘मी तोच आहे’ असा तिचा नाद घुमतो. जीव आणि देव दोन नाहीत. वाट दाखवणारे गुरुजी आपल्याच शिष्याच्या पाया पडतात. हेच तर सगळे नवल आहे.