संत कबीर · अंतरीचा देव
मुळाशी पाणी घाला
एकै साधै सब सधै, सब साधै सब जाय। जो गहि सेवै मूल को, फूलै फलै अघाय॥
एकाला साधले, की सगळे साधते; सगळ्यांना साधायला गेले, की सगळेच हातचे जाते. जो मुळाला धरून त्याची सेवा करतो, तो भरभरून फुलतो आणि फळतो. मुळाशी घातलेले पाणी प्रत्येक पानापर्यंत पोहोचते; पानांवर शिंपडलेले पाणी मुळापर्यंत कधीच जात नाही. ज्याने आपले संपूर्ण मन एका देवाला वाहिले, त्याला कशाचीच कमतरता राहत नाही. ज्याचे मन अनेक उद्दिष्टांत विखुरलेले आहे, त्याचे एकही उद्दिष्ट साध्य होत नाही.