संत कबीर · प्रेम आणि विरह
प्रेमाच्या रेशमाचा अंगरखा
प्रेम पाट का चोलना, पहिर कबीरु नाच। पानिप दीन्हों तासु को, जो तन मन बोले साँच॥
कबीरा, प्रेमाच्या रेशमाचा अंगरखा अंगात घाल आणि नाच, असे कबीर स्वतःलाच सांगतात. ज्याचा देह आणि मन दोन्ही खरे बोलतात, त्यालाच पाणी लाभते. पाणी म्हणजे इथे उंची मोत्याची चमक; मराठीतही मोत्याचे पाणी म्हणतात. दोह्यातल्या शब्दाचा दुसरा अर्थ आहे मान, प्रतिष्ठा. हे पाणी त्यालाच मिळते, जो देहाने आणि मनानेही खरा आहे, आणि ज्याच्या दोन्हींत कुठेच खोटेपणा नाही.