संत कबीर · प्रेम आणि विरह
कधी न उतरणारी नशा
हरि रस पीया जानिए, जे कबहूँ न जाइ खुमार। मैमंता घूँमत रहै, नाँहीं तन की सार॥
हरीचा रस खरोखर प्यायलेला माणूस कसा ओळखावा? त्याची नशा कधीच उतरत नाही. तो धुंदीत झोकांड्या खात फिरतो, आणि त्याला स्वतःच्या देहाचे भानच राहत नाही. दारूची नशा सकाळपर्यंत उतरते. हा रस तसा नाही. ज्याने तो एकदा चाखला, तो आयुष्यभर स्वतःला विसरून धुंदीत डुलत राहतो.