संत कबीर · प्रेम आणि विरह
न मागता देणारा फकीर
मोर फकीरवा मांगी जाय, मैं तो देखहूं न पाऊं मांगन से क्या मांगिये, बिन मांगे जो देय कहें कबीर मैं हौं वाही को, होनी हो सो होय
माझा फकीर भिक्षा मागायला आला, आणि निघूनही गेला; मला त्याचे दर्शनसुद्धा घडले नाही. जो न मागताच देतो, अशा भिकाऱ्याकडे मी काय मागू? कबीर ज्याला आपला फकीर म्हणतात, तो स्वतः प्रभूच आहे; पदरी काहीही न ठेवणाऱ्या फकिरासारखा तो कोणाच्या नजरेस न पडता फिरत असतो. कबीर म्हणतात, मी त्याचाच आहे, फक्त त्याचाच; आता जे व्हायचे असेल ते होवो.