संत कबीर · प्रेम आणि विरह
उशिरा हाती आलेला परीस
मूवां पीछैं जिनि मिलै, कहै कबीरा राम। पाथर घाटा लोह सब, (तब) पारस कौणें काम॥
रामा, मी मेल्यानंतर मला भेटायला येऊ नकोस, असे कबीर विनवतात. दगडांवर घासून घासून सारे लोखंडच झिजून गेले, तर मग परीस हाती येऊन काय करायचा? परीसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते, पण त्यासाठी लोखंड तरी शिल्लक असावे लागते. मरणानंतर होणारी देवाची भेट म्हणजे लोखंड संपल्यावर सापडलेला परीस.