संत कबीर · प्रेम आणि विरह
स्पर्शही न सोसणारे
राम बियोगी बिकल तन, इन्ह दुखवो मति कोय। छूवत ही मरि जायँगे, तालाबेली होय॥
रामाच्या वियोगाने ज्यांचे शरीर व्याकूळ झाले आहे, त्यांना कोणी दुखवू नका. नुसता स्पर्श झाला तरी ते प्राण सोडतील, इतकी त्यांची तडफड चालली आहे. यांना सर्वस्वाने देवाची आस लागली आहे. ओढीने ते इतके झिजले आहेत, की थोडीशी इजाही त्यांचा जीव घेईल.