संत कबीर · प्रेम आणि विरह
वात कातरली, की उजेड
सिर राखे सिर जात है, सिर काटे सिर सोय। जैसे बाती दीप की, कटि उजियारा होय॥
डोके राखायला गेलात, तर डोके जाते; ते कापून टाकले, तरच डोके उरते. दिव्याच्या वातीचेही असेच आहे: वात कातरली, की उजेड पडतो. डोके म्हणजे इथे अहंकार, आपण कोणीतरी आहोत हा ताठा. काजळी धरलेली वात ज्योत मंद करते; ती कातरली की दिवा लख्ख जळू लागतो. जो आपले ‘मी’पण छाटून टाकतो, तो काहीच गमावत नाही; उलट त्याला प्रकाश मिळतो.