संत कबीर · मन, अहंकार आणि माया
मनाची कोठी, देहाचा किल्ला
मन माया की कोठरी, तन संशय का कोट। बिषहर मंत्र माने नहीं, काल सर्प की चोट॥
मन म्हणजे जगातल्या इच्छांनी भरलेली मायेची कोठी, आणि देह म्हणजे संशयाचा किल्ला. मृत्यूचा काळसर्प डसला, की सर्पदंशावरचा कोणताही मंत्र चालत नाही. लोकांची समजूत अशी, की प्रत्येक सापाच्या दंशावर काही ना काही उतारा असतो. काळाच्या दंशावर मात्र उतारा नाही. माणूस कोठीत असो की किल्ल्यात, काळ त्याला तिथेही गाठतो.