संत कबीर · मन, अहंकार आणि माया
अंकुश नसलेला माहूत
मन गयंद माने नहीं, चले सुरति के साथ। महावत बिचारा क्या करे, जो अंकुश नांही हाथ॥
मन हा हत्ती आहे, आणि तो कोणाचेच ऐकत नाही. त्याचे लक्ष जिकडे ओढले जाते, तिकडे तो चालू लागतो. हातात अंकुशच नसेल, तर बिचारा माहूत तरी काय करणार? माहूत अंकुशानेच हत्तीला हवे तिकडे वळवतो. नुसते मनात आणून हत्ती वळत नाही, इतका तो ताकदवान असतो. मनाचेही तसेच आहे.