संत कबीर · मन, अहंकार आणि माया
शिकारीला निघालेली तृष्णा
तन तुरंग असवार मन, कर्म पियादा साथ। तृस्ना चली सिकार को, विषय बाज लिये हाथ॥
देह हा घोडा, आणि मन त्यावरचा स्वार. माणसाचे कर्म पायदळातल्या शिपायासारखे सोबत असते. तृष्णा शिकारीला निघाली आहे, आणि तिच्या हातावर विषयसुखाचा ससाणा बसला आहे. पूर्वी सरदार घोड्यावर बसून शिकारीला जात. बरोबर पायी शिपाई चालत, आणि मनगटावर सावजावर झडप घालायला शिकवलेला ससाणा असे. या शिकारीच्या लवाजम्यात अख्खा माणूसच सामील आहे, आणि सगळ्यांच्या पुढे आहे ती तृष्णा.