संत कबीर · मन, अहंकार आणि माया
सापाने वेढलेले चंदन
चन्दन सर्प लपेटिया, चन्दन काह कराय। रोम-रोम विष भीनिया, अमृत कहाँ समाय॥
चंदनाच्या झाडाला साप वेटोळे घालून बसला आहे. त्यात चंदन तरी काय करणार? सापाच्या रोमारोमात विष भिनले आहे; मग त्यात अमृत शिरणार तरी कुठे? चंदन शीतल आणि सुगंधी असते, आणि त्याच्या खोडाला साप बिलगून असतात, असे म्हणतात. तरीही त्याचा गारवा सापाच्या अंगात कधी उतरत नाही. ज्याचा स्वभावच नखशिखांत विष, त्याच्यात गोडव्याला जागाच उरत नाही.