संत कबीर · मन, अहंकार आणि माया
इच्छेचा चौथरा
सुख सिंधु की सैर का स्वाद तब पाई है चाह का चौतरा भूल जावै बीज के माहिं ज्यों बृच्छ विस्तार यों चाह के माहिं सब रोग आवै॥
इच्छा हा एक चौथरा आहे, गावात झाडाभोवती बांधतात तसा मातीचा किंवा दगडाचा पार. माणूस तो पार विसरतो, तेव्हाच सुखाच्या अथांग सागरात मनसोक्त फिरण्याचा स्वाद त्याला घेता येतो. एवढा मोठा पसरलेला वृक्ष जसा एका बीजात दडलेला असतो, तसे सगळे रोग इच्छेच्या पोटात लपलेले असतात.