संत कबीर · वाणी, संगत आणि आचरण
सुपासारखा साधू
साधू ऐसा चाहिये, जैसा सूप सुभाय। सार सार को गहि रहै, थोथा देइ उड़ाय॥
साधू कसा असावा? सुपासारख्या स्वभावाचा. जे कसदार आहे ते तो धरून ठेवतो, आणि पोकळ फोलपटे उडवून देतो. धान्य पाखडताना सुपात जड दाणे राहतात, आणि हलके फोलपट वाऱ्यावर उडून जाते. असा साधूही समोर येईल त्यातले सत्त्व ठेवतो, आणि बाकीचे सोडून देतो.