संत कबीर · वाणी, संगत आणि आचरण
काळजात रुतलेले कुसळ
करक करेजे गड़ि रही, बचन वृक्ष की फाँस। निकसाये निकसे नहीं, रही सो काहू गाँस॥
काळजात खोलवर एक कळ बसून राहिली आहे. शब्दांच्या झाडाचे एक कुसळ तिथे आत घुसले आहे. ते काढायला जावे, तर निघत नाही. बाणाच्या टोकासारखे ते तिथेच रुतून राहते. मोठा काटा असेल, तर बोटांनी धरून ओढून काढता येतो. कुसळ इतके बारीक असते की हाताला लागतच नाही, आणि ते आत आत सरकत जाते. काळजात शिरलेला शब्दही असेच करतो.