संत कबीर · वाणी, संगत आणि आचरण
साधूच्या घरचा कोंडा
कबीर संगत साधु की, जौ की भूसी खाय। खीर खांड भोजन मिलै, साकट संग न जाय॥
साधूची संगत धरा, कबीर म्हणतात, मग तिथे खायला जवाचा कोंडाच का मिळेना. साकटाकडे खीर आणि साखरेचे जेवण वाढलेले असले, तरी त्याच्या संगतीला जाऊ नका. जवाचा कोंडा म्हणजे भुसा, गुराढोरांना घालतात तसला. ‘साकट’ हा शब्द ‘शाक्त’, म्हणजे शक्तिदेवीचा उपासक, यावरून आला आहे. पण कबीर आणि त्यांच्या काळातले संत तो देवावर प्रेम नसलेल्या कोणाही माणसासाठी वापरत. अशा माणसाच्या पंगतीतली मेजवानी त्या कोंड्यापेक्षाही हलकी.