संत कबीर · वाणी, संगत आणि आचरण
मेलेल्या कातड्याचा भाता
दुर्बल को न सताइये, जाकी मोटी हाय। बिना जीव की स्वास से, लोह भसम होइ जाय॥
दुबळ्याला छळू नका; त्याचा उसासा, त्याचा तळतळाट फार भारी पडतो. निर्जीव वस्तूच्या श्वासानेही लोखंडाची राख होते. लोहाराचा भाता मेलेल्या जनावराच्या कातड्याचाच तर बनलेला असतो. त्या कातडी पिशवीच्या प्रत्येक फुंकरीने भट्टी इतकी तापते, की लोखंडही जळून जावे. आणि तो श्वास तर निर्जीव असतो. छळलेल्या माणसाचा उसासा जिवंत काळजातून निघतो.