संत कबीर · वाणी, संगत आणि आचरण
घरापुरते आणि दारच्या साधूपुरते
साईं इतना दीजिये, जा में कुटुंब समाय। मैं भी भूखा ना रहूँ, साधु न भूखा जाय॥
कबीर देवापाशी एवढेच मागतात: प्रभो, माझे कुटुंब त्यात मावेल इतकेच मला दे. मीही उपाशी राहू नये, आणि दारी आलेला कोणी साधूही उपाशीपोटी परत जाऊ नये. कबीर साठा मागत नाहीत, धनदौलतही मागत नाहीत. घरच्यांचे पोट भरेल आणि दारी आलेल्या साधूलाही दोन घास मिळतील, एवढे असले की त्यांना पुरे.