ऐसी वाणी बोलिए, मन का आपा खोय।
औरन को शीतल करे, आपहुं शीतल होय॥
मनातला मीपणा आधी सोडा, आणि मग बोला. असे बोललेले शब्द ऐकणाऱ्याचे मन निववतात, आणि बोलणाऱ्याचेही.
आपल्याकडे शांत मनाला नेहमीच शीतल म्हटले आहे, आणि राग-अहंकाराला दाह. अहंकार आधीच उतरवून ठेवला, की शब्द दोन्ही बाजूंना शांतता आणतात: ऐकणाऱ्यालाही आणि बोलणाऱ्यालाही.