संत कबीर · वाणी, संगत आणि आचरण
खांड्याच्या धारेवरची वाट
साधु कहावन कठिन है, ज्यों खाँड़े की धार। डगमगाय तो गिरि परे, निश्चल उतरे पार॥
साधू म्हणवून घेणे सोपे नाही; ते खांड्याच्या, म्हणजे दुधारी तलवारीच्या, धारेवरून चालण्याइतके कठीण आहे. जरा डगमगलात, तर खाली पडाल. स्थिर राहिलात, तर पैलतीराला पोचाल; संसार ओलांडून देवापाशी जाल. धारेवर डावीकडे-उजवीकडे जागाच नसते. इतक्या अरुंद वाटेवर एक पाऊल जरी चुकले, तरी पडणे ठरलेले. एक तर पडायचे, नाही तर पोचायचे; मधला रस्ता नाही.